नवी दिल्ली ;
सोन्याची मागणी मागील काही महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाली होती, परंतु सोने किमतीत झालेल्या घसरणीमुळे चालू महिन्यात डिसेंबरच्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांची मागणी ही 10 ते 20 टक्क्यांनी वाढली आहे. चालू वर्षात एप्रिल, मे आणि जून महिन्यांमध्ये विवाहाचे अनेक मुहूर्त असल्याने सोने मागणी वर्ष 2021 मध्ये वेगोने वाढत जाणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत.
डिसेंबरमध्ये 24 कॅरेट सोन्याची किमत 50 हजार रुपये होती, जी सध्या 48,900 रुपयाच्या आसपास राहिली आहे. यामध्ये 22 कॅरेटची किमत साधारणपणे 47,900 रुपये राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऑगस्ट 2020 च्या तुलनेत स्वस्त
ऑगस्ट 2020 मध्ये कोरोना महामारीच्या प्रकोपामुळे सोने दर 57 हजार रुपयाच्या घरात पोहोचला होता. परंतु कोरोना लस आल्याच्या कारणामुळे पुन्हा एकदा सोने दरात घसरण नोंदवली आहे. यामध्ये ऑगस्टपासून आतापर्यंत सोने किमतीत 8 हजार रुपयांपर्यंत 16.5 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.









