कोरोनाचा संसंर्ग फैलवू नये यासाठी डिचोली बचाव अभियानचा पुढाकार. सात हजार लीटर सेनिटाईझरची फवारणी. डिचोली अग्निशामक दलाचे सहकार्य.
प्रतिनिधी / डिचोली
डिचोली शहरात तसेच बाजारात येणाऱया लोकांना कोवीडच संसंर्ग होऊ नये यासाठी डिचोली बाजारात व शहरातील बहुतेक गर्दीच्या जाग्यांवर डिचोली बचाव अभियानतर्फे सेनिफवारणी करण्यात आली. डिचोली अग्निशामक दलाच्या सहकार्याने सुमारे सात हजार लीटर सेनिटाईझरची फवारणी करत बाजारासह सर्व सार्वजनिक ठिकाणे सेनिटाईझ करण्यात आली.
यावेळी डिचोली बचाव अभियानचे अध्यक्ष तथा मजी आमदार नरेश सावळ, नगरसेवक निसार शेख, मेधा बोर्डेकर, माजी नगरसेवक कमलाकर तेली भगवान हरमलकर, डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद गावस, शिवाजी नाईक, बचाव अभियानचे सचिव नरेश कडकडे, सुदीन नायक, भालचंद्र नार्वेकर, गोकुळदास हरमलकर, सुनील पळ व इतरांची उपस्थिती होती.
राज्य सध्या ग्रीन झोनमध्ये असतानाही राज्यातील विविध भागात वाढत असलेल्या कोरोना रूग्णांमुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. यावर उपाय म्हणजे प्रत्येकाने स्वतःची स्वतः काळजी घेणे आवश्यक आहे. तरीही शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणे लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत सुरक्षित असावी. हि शासना तसेच सामाजिक संस्थां®ााr जबाबदारी आहे. त्यासाठीच डिचोली बचाव अभियानतर्फे डिचोलीतील लोकांची काळजी घेण्यासाठी म्हणून डिचोली शहर परिसर सेनिटाईझ करण्यात आले आहे. अशी माहिती माजी आमदार नरेश सावळ यांनी दिली. या कामात सहकार्य केल्याबद्दल त्यांनी यावेळी अग्निशमनचे संचालक अशोक मेनन यांचे आभार मानले.
डिचोली बाजारात डिचोली बरोबरच आजूबाजूच्या परिसरातील लोक मोठय़ा संख्येने येतात. बाजाराच्या दिवशी तर मोठय़ा प्रमाणात लोक खरेदीसाठी येतात. आज कोवीडचे सकारात्मक रूग्ण राज्यातील ग्रामीण भागातही मिळू लागल्याने सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी वाटू लागली आहे. अवा लोकांना बाजारात भितीशिवाय फिरता यावे यासाठी डिचोली बचाव अभियानने हाती घेतलेला हा स्तुत्य उपक्रम असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक निसार शेख, मेधा बोर्डेकर व माजी नगरसेवक कमलाकर तेली यांनी व्यक्त केली.
डिचोली बाजारातील गणेश पूजन मंडपामधून सेनिटाईझर फवारणीला सुरूवात झाली. नरेश सावळ यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. डिचोली संपूर्ण बाजार परिसर, व्होडली, बंदरवाडा, बसस्थानक व परिसर व शहरातील दररोज गर्दी होणाऱया जागांवर फवारणी करण्यात आली. या उपक्रमानंतर डिचोली बचाव अभियानला या उपक्रमात मदत करणाऱया अग्निशामक दलाच्या अधिकारी व जवानांच्या प्रती कृतज्ञता म्हणून माजी आमदार नरेश सावळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.









