प्रतिनिधी / बेळगाव
महाद्वार रोड सांस्कृतिक समितीच्या वतीने आयोजित डान्स स्पर्धेला भरघोस असा प्रतिसाद मिळाला. बुधवारी या डान्स स्पर्धेची सांगता झाली. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बेळगाव सह आसपासच्या परिसरातील एकापेक्षा एक सरस असे डान्स स्पर्धकांनी सादर करून बेळगावकर रसिकांची मने जिंकली.
सामाजिक कार्यकर्ते संजय कडोलकर यांच्या संकल्पनेतून मागील चार वर्षांपासून या भव्य अशा डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. सलग पाचव्या वषी देखील या स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळाला. विविध डान्स प्रकार या स्पर्धेवेळी स्पर्धकांनी सादर केले. ही स्पर्धा पाहण्यासाठी संभाजी मैदानात तुडुंब गर्दी झाली होती.
अंध मुलांनी आणली रंगत
या स्पर्धेवेळी माहेश्वरी अंध शाळेच्या मुलींनी सादर केलेले नृत्य उपस्थितांची वाहवा मिळवून गेले. सर्वानी या मुलींचे कौतुक केले. योगा प्रात्यक्षिक मधुन सादर केलेले नृत्य उत्तम ठरले.
फॅन्सी डेस ठरले सरस
सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, औरंगजेब, मी मोबाइल बोलतोय असे विविध डेस परिधान करून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धकांनी बेळगावकरांची मने जिंकली.









