नेल्लोर / वृत्तसंस्था
आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्हय़ात टेम्पो आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. तसेच 6 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेल्लोरच्या दिशेने जाणाऱया ट्रकमध्ये 15 प्रवासी होते. हा अपघात इतका भीषण होता की त्यात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी मदतकार्यात केले. तसेच अपघाताची माहिती पोलीस खात्याला दिल्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.









