वृत्तसंस्था/ टोकियो
संपूर्ण जपान देशाला सध्या कोरोना समस्येच्या कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करावे लागत असल्याने येथे होणाऱया आगामी टोकियो पॅरा ऑलिंपिक स्पर्धेसाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीवर निर्बंध घालण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला आहे.
जपानच्या अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. टोकियो पॅरा ऑलिंपिक स्पर्धेवेळी प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही. ही स्पर्धा प्रेक्षकविना घेतली जाणार आहे.









