ऑनलाईन टीम / टोकियो :
टोकियो ऑलिम्पिकवरील कोरोना संकटाचे ढग अधिक गडद होत आहेत. टोकियो ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये आणखी दोन खेळाडू कोरोना संक्रमित झाले आहेत. तेथील कोरोना संसर्गाची ही आतापर्यंतची तिसरी घटना आहे. यापूर्वीही एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. या तिन्ही संक्रमित रुग्णांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे. आयोजन समितीचे अध्यक्ष सिको हाशिमोतो यांनी या प्रकरणाची पुष्टी केली.
टोकियोत 23 जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परदेशातून आलेला एक खेळाडू काल कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर आज दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले.