जगप्रसिद्ध अभिनेता टॉम क्रूजचा चित्रपट
हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूज सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘टॉप गन मेवरिक’मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 1986 मध्ये प्रदर्शित टॉमचा सुपरहिट चित्रपट ‘टॉप गन’चा सीक्वेल आहे. या चित्रपटाचे चाहते सीक्वेलची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. याचदरम्यान निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. प्रदर्शित होताचा हा ट्रेलर सुपरहिट ठरला आहे.

टॉप गन मेवरिकमध्ये टॉम क्रूज स्वतःच्या कॅप्टन पीट मेवरिक मिशेल या भूमिकेत पुन्हा दिसून येणार आहे. यंदा तो टॉप गनचा टेस्ट पायलट आणि इंस्ट्रक्टर म्हणून झळकणार आहे. चित्रपटात पुन्हा एकदा प्रभावी फ्लाइंग ऍक्शन दिसून येतील असे ट्रेलर पाहून स्पष्ट होते. चित्रपटाची कहाणी टॉप गनच्या 10 वर्षांनंतरची दर्शविण्यात आली आहे. यात अँथनी एडवर्डच्या भूमिकेत मिल्स टेलर दिसून येणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन जो कोसिंस्की यांनी केले आहे. यात टॉम क्रूजसह वॉल किल्मर, जेनिफर कॉनेली, लुई पुलमॅन, चार्ल्स पार्नेल, जय एलिस, जॉन हॅम, माइल्स टेलर, एड हॅरिस, बशीर सलाहुद्दीन आणि मोनिका बारबरो मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. हा चित्रपटा 27 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.









