वृत्तसंस्था / पॅरिस
पेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत झेकची महिला टेनिसपटू बार्बरा क्रेसिकोव्हाने दुहेरी मुकुट संपादन केला. या स्पर्धेत शनिवारी तिने महिला एकेरीचे जेतेपद मिळविले होते तर रविवारी तिने महिला दुहेरीचे अजिंक्यपदही पटकाविले.
रविवारी झालेल्या महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात झेकच्या क्रेसिकोव्हा आणि तिची साथीदार सिनियाकोव्हा यांनी इगा स्वायटेक आणि बेथनी मॅटेक सँडस् यांचा 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद मिळविले. 2000 नंतर पेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरी आणि दुहेरीचे जेतेपद मिळविणारी झेक प्रजासत्ताकची 25 वर्षीय क्रेसिकोव्हा ही पहिली टेनिसपटू आहे. फ्रान्सच्या मेरी पियर्सने 2000 साली या स्पर्धेत असा विक्रम नोंदविला होता.









