वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएसला 4 जी नेटवर्क सेवा भारतात विस्तारासाठी बीएसएनएलकडून 15 हजार काटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली असल्याची माहिती आहे. सदरचा करार टाटाच्या दूरध्वनी क्षेत्रातील तेजस नेटवर्क्स यांच्यासोबत झाल्याचे कळते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस)सरकारच्या मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या 4 जी विस्तारासाठी करार केला असल्याचे शेअरबाजाराला सांगण्यात आले आहे. भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यात कंपनी म्हणून टीसीएसकडे पाहिले जाते. तेजस नेटवर्क्सच्या माध्यमातून 4जीशी निगडीत उपकरणे बीएसएनएलला वितरीत केली जाणार आहेत. देशभरात विविध शहरांमध्ये दूरध्वनीशी निगडीत 4 जी सेवा बीएसएनएलला विस्तारायची आहे.
2023 मध्ये पाहता टीसीएसला ही तिसरी ऑर्डर प्राप्त झाली आहे. याआधी अमेरिकेतील फोनिक्स समूह व ब्रिटनमधील रिटेल कंपनी मार्क्स अँड स्पेन्सरची ऑर्डरदेखील कंपनीला प्राप्त झाली होती.









