वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
न्यूझीलंडचे क्रिकेटपटू टीम साऊदी आणि सोफी डिव्हाइन यांचा न्यूझीलंड क्रिकेटपटूंच्या संघटनेतर्फे बुधवारी गौरव करण्यात आला. न्यूझीलंड क्रिकेटपटूंच्या संघटनेतर्फे टीम साऊदीला ‘प्लेअर्स कँप’ आणि सोफी डिव्हाइनला सीपीए प्लेअर्स पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
न्यूझीलंड क्रिकेटपटू संघटनेचे सदस्य रिबेका रोल्स यांच्या हस्ते डिव्हाइनचा पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. न्यूझीलंड क्रिकेटपटूंच्या संघटनेतर्फे टीम साऊदीने प्लेअर्स कँपचा पुरस्कार दुसऱयांदा तर डिव्हाइनने सीपीए प्लेअर्स पुरस्कार तिसऱयांदा पटकाविला आहे.









