ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना लढ्यात 1500 कोटींचा निधी देणारे रतन टाटा पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आले आहेत. कोरोना लढ्यात अत्यावश्यक वस्तूंचा देशभरात उपयोग व्हावा यासाठी टाटा ट्रस्ट आता या वस्तूंना एअरलिफ्ट करण्याचे काम करणार आहे. या अंतर्गत 150 कोटींचे वैद्यकीय साहित्य देशभरात पोहचवले जाणार आहे. अशी माहिती टाटा ट्रस्ट कडून देण्यात आली.
या संदर्भात टाटा ग्रुप चे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. टाटा समूहाकडून कव्हरऑल्स , मास्क यांचा समावेश असलेले पीपीई किट्स, संरक्षक सूट, हातमोजे, सर्जिकल मास्क आदी साहित्य देशभरात पोहचवले जाणार आहे. येत्या काही आठवड्यात गरजू भागात हे साहित्य वितरित करण्यात येणार आहे.
रतन टाटा यांनी सांगितले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे माणसा समोरील मोठे संकट आहे. त्यामुळे या संकटाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य तात्काळ गरजेच्या ठिकाणी पोहचणे आवश्यक आहे. अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, याआधी ही टाटा ट्रस्ट कडून कोरोना लढ्यासाठी 500 कोटी तसेच गरजूंना जेवण आणि या लढ्यात आपला जीव धोक्यात घालून मदत करणाऱ्या डॉक्टरांची राहण्याची सोय फाइव स्टार हॉटेल हॉटेलमध्ये केली आहे.









