नवी दिल्ली : नवीन टाटा सफारी येत्या 22 फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारात दाखल करण्यात येणार आहे. कंपनी सादरीकरणाच्या वेळीच या मॉडेलच्या किंमतीची घोषणा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र कंपनीने एसयूव्हीचे बुकिंग घेण्यास प्रारंभ केला असून ग्राहकांना 30 हजार रुपयामध्ये बुकिंगची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
नवी सफारी टाटा कंपनीच्या ओमेगा प्लॅटफॉर्मवर आधारीत राहणार असून ती लँड रोव्हरच्या डी8 प्लॅटफॉर्मच्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे. सफारीचे काही डिझाईन एलिमेंट आणि कंपोनेंट हॅरियरसोबत मिळते जुळते आहेत.
इंजिनसह कार्यक्षमता
2021 मध्ये बाजारात दाखल होणाऱया टाटा सफारीमध्ये 2.0 लिटर क्रायोटेस डिजल इंजिन असेल. या इंजिनात 170 पीएस पॉवर आणि 350 एनएमचा टॉर्क देण्यात येईल, असे सांगण्यात आले.









