प्रतिनिधी/कोल्हापूर
टाकाळा येथे गॅस गळती होवून स्फोट झाला. यामध्ये दोघे जण जखमी झाले असून घराचे मोठे नुकसान झाले. मोईनुद्दीन जमादार (वय 70), नियाज जमादार (55) अशी या जखमीची नावे आहेत. या स्फोटात घराच्या दोन भिंती आणि घराचे छप्पर हादरले. तर, स्फोटाच्या आवाजाने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. दरम्यान या घटनेची माहिती अग्निशमन दलास मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
याबाबत अधिक माहिती अशी की, टाकाळा येथे जमादार कुटूंब राहते. सोमवारी सकाळी गॅस गळती होवून त्यांच्या घरामध्ये स्फोट झला. स्फोटाची तिव्रता इतकी भिषण होती की, या हादऱ्याने घराचे मोठे नुकसान झाले. घरातील प्रापंचीक साहित्य, आणि घराचे छत हादऱयाने उडून गेले. दरम्यान या घटनेमध्ये मोईनुद्दीन जमादार, नियाज जमादार हे दोघे जखमी झाले. त्यांच्या अंगावर घराच्या छताचा व भिंतीची भाग कोसळला. अग्नीशमन दलाच्या प्रभारी स्टेशन अधिकारी जयवंत खोत, चालक उमेश जगताप, वरिष्ठ फायरमन वामन चौरे, फायरमन मधुकर जाधव, केरबा निकम, अवधुत चव्हाण, यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवन जखमींना बाहेर काढले व त्यांना उपचारासाठी सिपीआर रुग्णालयात दाखल केले.









