प्रतिनिधी / शिरोळ
टाकवडे येथे झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शिरोळ पोलीसांना यश आले असून संशयित आरोपी आकाश काशिनाथ दबडे (वय १९), तनवीर शकील शेख (वय २१) व समीर फकरुद्दीन नदाफ (वय २०) यांना अटक करण्यात आली आहे तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात पोलीसांना ही यश आले आहे.
टाकवडे येथून दुधाची भुकटी चोरीला गेलेली होती. याबाबत शिरोळ पोलिसांनी सापळा रचत संशयीत तीघांना ताब्यात घेतले आहे. त्याबाबत संशीयांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. तसेच त्यांच्याकडून दुधाची भुकटी, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सुळ, ज्ञानेश्वर सानप, हनुमंत माळी, सुनिल पाटील, ताहिर मुल्ला, गजानन कोष्टी, अभिजित परब, युवराज खरात यांच्या पथकाने केली.