प्रतिनिधी / सातारा
कोरोना महामारीचे संकट सुरू आहे. त्यातच शिक्षक बदलीचे फर्मान निघाले आहे. दोन दिवसांपूर्वी शिक्षण समितीच्या बैठकीनंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने हो किंवा नाही असा अहवाल सोमवारी मागवला आहे. रविवारी दुपारपर्यंत हा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापर्यंत पोहचला नव्हता. हो असे म्हणावे तरी कोडे नाही म्हणावे तरी कोडे बनले आहे.
शिक्षक बुचकळ्यात पडले आहेत. शिक्षक संघटनांची चुप्पी असून अंतरासाठी गुगल मॅपचा निकष लावला गेला आहे. शिक्षकांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्याबाबत तीव्र नाराजी सद्या उमटत आहे. एकंदर शिक्षक बदल्यांची प्रक्रिया पाहता अजय देवगणच्या टोटल धमाल या चित्रपटाप्रमाणे सुरू आहे.
जेवढे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. तेवढे त्याचे फायदे जसे तसे तोटे असतात. गुगलवर काहीही शोधलं तरी ते लगेच मिळत, गुगल माहितीचा खजिना आहे. गुगलच्या सहाय्याने हरवलेलं ठिकाण शोधता येतं तसाच प्रकार अजय देवगण यांच्या टोटल धमाल या चित्रपटात झाला आहे. नेमका तसा काहीसा प्रकार जिल्हा परिषदेच्या सध्या सुरू असलेल्या बदली प्रक्रियेत होतं आहे. शिक्षक बदलीत शाळा आणि घर अंतर, पतिपत्नी शाळा अंतर असं बरच काहीसं नियम होत. अंतराचे दाखले मिळवण्यासाठी गतवर्षी शिक्षकांना बांधकाम विभाग, एसटी विभागाचे खेटे मारावे लागले होते. सध्या कोरोनाचे मोठे संकट आहे.
या संकटात ही शिक्षक बदल्यांचे आदेश दिले गेले आहेत. त्यात शिक्षक समितीच्या बैठकीनंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांची बैठक पार पडली. त्यांना शिक्षकांचे बदल्यांच्या अनुषंगाने हो किंवा नाही असा अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहे. बदल्या हो म्हणावे तरी आपण लांबच्या शाळेवर जाऊ शकतो नाही म्हणावे तरी जाऊ शकतो अशी भीती सध्या शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यात पतिपत्नी एकत्रित शाळा मिळावी यासाठी गुगल मॅपचे अंतर ग्राह्य धरण्याचे म्हटले गेले आहे, गुगल मॅपनुसार शाळा जरी जवळ असली तरीही तेथे जायला रस्ता हा लांबून असतो हेच कोडे शिक्षकांच्या समोर ठाकले आहे. त्यामुळे शिक्षक गोंधळून गेले आहेत.
Previous Articleसोलापूर : बार्शीत आधी कोरोना चाचणी मगच दुकान उघडण्यास परवानगी
Next Article खानापूर तालुक्यात आणखी चौघांची भर









