प्रतिनिधी / बेळगाव
द. म. शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये रथसप्तमीचे औचित्य साधून सूर्यनमस्कार घालण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक मनोज जाधव यांनी केले.
सागर बेळगुंदकर व मनोज जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुलांनी सूर्यनमस्कार घातले व सूर्याला वंदन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षकवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.









