वार्ताहर/ लाटंबार्से
नानोडा डिचोली येथील ज्येष्ठ पत्रकार विशाल कळंगुटकर (68) यांचे शनिवार 28 रोजी नानोडा येथे अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सून, नातू असा परिवार आहे. जवळजवळ 30 ते 35 वर्षे ते पत्रकार क्षेत्रात कार्यरत होते. तरुण भारतचे डिचोली प्रतिनिधी म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले होते. ते नानोडा येथील श्री शांतादुर्गा कळंगुटकरीण देवस्थानचे माजी सचिव होते. अंत्यसंस्कार रविवार 29 रोजी करण्यात येतील.









