ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन विजयी झाले तर महिनाभरातच कम्युनिस्ट विचारांच्या कमला हॅरिस या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद बळकावतील, असा आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
उपाध्यक्षपदाचे दोन उमेदवार कमला हॅरिस आणि माईक पेन्स यांच्यात पहिली जाहीर चर्चा झाली. या चर्चेनंतर ट्रम्प यांनी भाष्य केले.
ट्रम्प म्हणाले, कमला हॅरिस या सोशॅलिस्ट नाहीत तर कम्युनिस्ट विचारांच्या आहेत. खुनी आणि बलात्काऱ्यांसाठी त्यांना देशाची सीमा खुली करायची आहे. वादविवाद स्पर्धेतील त्यांचे बोलणे ऐकून घेण्यासारखे नव्हते. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले तर हॅरिस दोन महिन्यात त्यांच्याकडून अध्यक्षपद हिसकाऊन घेतील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.









