प्रतिनिधी / सातारा
जेजुरी मंदिर उघडले भंडार्याचे लेणे उधळले नवनिर्वाचित प्रमुख विश्वस्तांनी केला जेजुरीगड विकासाचा संकल्प. खंडोबा मंदिर शिखराला मिळणार सोन्याचे झळाळी तर पुरंदर आमदारांचा खंडोबा देवास सपत्नीक अभिषेक भाविकांनी घेतला देवदर्शनाचा आनंद संपूर्ण राज्यात शासनाने मंदिर खुले करण्याच्या निर्णयाचे जोरदार स्वागत होत असून राज्याचे कुलदैवत आणि भारतीय लोकदैवत असलेल्या जयाद्री खंडोबा मंदिर खुले होताच भाविकांनी आनंद व्यक्त करीत भंडार्याचे लेणे उधळून जोरदार स्वागत केले आहे तर नवनिर्वाचित मार्तंड देवसंस्थान समिती अध्यक्ष सोलीसिटर प्रसाद शिंदे यांनी भंडार उधळत मंदिर विकासाचा संकल्प करून लवकरच मंदिर शिखराल सोन्याची झळाळी देणार असल्याचे जाहीर केले आहे प्रसंगी पारंपारिक गुरव पुजारी यांच्या धार्मिक विधी नुसार पुरंदर तालुका आमदार संजय जगताप यांनी सपत्नीक मल्हारी देवाला पहिला अभिषेक केल्या नंतर भाविकान करिता मंदिर खुले करण्यात आले सद्या भाविकान शासकीय नियमानुसार मुखदर्शन घेता येत असून विशिष्ठ वेळेतच केवळ शंभर भाविकांना दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे पूर्ण खबरदारी मंदिर प्रशासनाने घेतली असून सॅनिटायझर, थर्मामीटरवर तापमान चेक करूनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे श्री मार्तंड देवसंस्थान चे प्रमुख अध्यक्ष सोलीसिटर प्रसाद शिंदे यांनी संपूर्ण गड परीसारची पाहाणी करत शासनच्या मंदिरे खुले करण्याच्या धोरणाचे स्वागत करत गडावर येणाया भाविकांच्या प्रथम सुरक्षा दृष्टी कोनातून सोयसुविधा केल्या जातील असे सांगितले काही असो मंदिरे खुली झाली असून भाविक पुजारी सेवक कर्मचारी यांनी आता सुरक्षित अंतर ठेऊन दर्शन घेतले तर भविष्यात आपल्या भक्ती श्रद्धेचे उत्सव मोठय़ा आनंदात साजरे केले जातील एवडे मात्र खरे.









