18 विभागीय 22 शाळांतील 777 विद्यार्थ्यांचा सहभाग : तीन दिवस स्पर्धा उत्साहात
प्रतिनिधी /बेळगाव
जीएसएस पीयु कॉलेजच्यावतीने आयोजित गेले तीन दिवस मिराकी 22 च्या अंतर्गत शालेय विद्यार्थीसाठी आयोजित 18 विभागीय स्पर्धांमध्ये 22 शाळेतील 777 विद्यार्थी सहभागी झाले होते. तीनही दिवस नृत्य, चित्रफीत, छायाचित्र, मैदानी खेळ, रोबोटिक्स,गायन, प्रश्नमंजुशा, चित्रकला अशा स्पर्धा पार पडल्या.
विविध स्पर्धाचे नेतृत्व करत व स्पर्धेत भाग घेत अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. या स्पर्धेमध्ये शालेय शिक्षकांनाही सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव देत स्पर्धेचा आनंद घेतला.
स्पर्धेचे नियोजन प्राध्यपक वर्गाने सुव्यवस्थिपणे केले. सांगता आणि पारितोषिक वितरण सोहळय़ास प्रमुख पाहुण्या म्हणून पंख संस्थेच्या गौरी मांजरेकर उपस्थित होत्या. तसेच एसकेई सोसाइटीचे व्हाईस चेअरमन एस. वाय. प्रभू, डी. बी. कलघटगी, अशोक शानभाग, इतर कार्यकारी मंडळ, प्राव्यापक उपस्थित होते.
प्रारंभी सृष्टी बागेवाडी व विद्यार्थी समुहाने स्वागत गीत म्हटले. प्राचार्य प्रणव पीत्रे यांनी स्वागत केले. मिराकी 22 कार्यक्रमाचा तीन दिवसाचा अहवाल प्रा. किर्ती फडके यांनी सादर केला.
विद्यार्थी सुव्यवस्थित घडवायचा असल्यास स्पर्धात्मक आयोजनाची गरज
प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. भारती सावंत यांनी करून दिला. गौरी यांनी विद्यार्थी सुव्यवस्थित घडवायचा असल्यास, आशा प्रकारचे स्पर्धात्मक आयोजन गरजेचे आहे, असे सांगितले. तीन दिवस चाललेल्या स्पर्धेचे आकर्षक आणि रोचक आयोजनाचे प्रदर्शन शालेय विद्यार्थी वर्गास पहाण्यास आयोजित करण्यात आले होते. मेराकी 2022 चे विजेता सम्मान केएलई सोसायटीच्या ईन्टरनॅशनल स्कूलने पटकावले तर उपविजेतेपद डीव्हाईन प्रोव्हिडन्स (डी. पी.) शालेयने पटकावले. त्यांचा मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन व्हिरेल वॉझ व अनघा हसबे, निधी कुलकर्णी यांनी केले.









