प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात नव्याने 77 लोकं कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. यापैकी 38 जण आरटीपीसीआर चाचणीत बाधित सापडले. तर 39 जण ऍंटीजेन चाचणीत बाधित सापडले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये नव्याने बाधित 77 रूग्णांमध्ये 7 जण खेड, 12 गुहागर, चिपळूण 21, संगमेश्वर 1, रत्नागिरी 33, राजापूर 3 रूग्ण सापडले. आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 263 मृत्यूमुखी पडले. मृत्यूचा दर 3.55 टक्क्यावर जावून पोहोचला. आतापर्यंत रत्नागिरी जिह्यात 6325 लोकांनी कोरोनावर मात केली. गेल्या 24 तासात 109 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तीचा दर 85 टक्के एवढा आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिह्यात 7408 एवढे बाधित रूग्ण आढळले.
नवे रूग्ण-77
एकूण पॉझिटीव्ह-7408
नवे मृत्यू-02
एकूण मृत्यू -263









