प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कारोना विषाणूचे रूग्ण आढळलेले 4 परिसर कन्टेंमेन्ट झोन तयार करून सील करण्यात आले होत़े यामधील खेड मधील भागात अद्याप कन्टेंमेंट झोनची बंदी कायम ठेवण्यात आली आह़े तर साखरतर, राजीवडा व गुहागर येथील बंदी उठविल्याचे सांगण्यात आले आह़े प्रशासनाकडून कन्टेंमेन्ट झोन तयार करताना निकष सारखेच असताना बंदी उठविताना वेगवेगळा कालावधी समोर येत असल्याने आर्श्चय व्यक्त करण्यात येत आह़े
जिह्यातील शृंगारतळी गुहागर येथे 18 मार्च रोजी पहिला कारोनाचा रूग्ण आढळून आला होत़ा यानंतर हा परिसर सील करण्यात आला होत़ा मात्र काही दिवसात या रूग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होत़े तसेच नंतरही या परिसरातून कारोनाचा रूग्ण असल्याचे समोर न आल्याने 6 एप्रिल रोजी शृंगारतळीची बंदी उठविण्यात आल़ी सुमारे 20 दिवसांचा कन्टेमेंट झोनचा कालावधी या परिसरात ठेवण्यात आला होत़ा
रत्नागिरी शहरानजीक असलेल्या साखरतर येथे कारोनाचे 3 रूग्ण आढळून आले होत़े याठिकणी 7 एप्रिल रोजी महिलेला कारानाची लागण झाल्याचे समोर आले होत़े ही बाब समोर येताच हा परिसर पोलिसांकडून सील करण्यात आला होत़ा यानंतर 9 एप्रिल रोजी या महिलेच्या जावेला कारोना असल्याचे समोर आले होत़े तसेच 14 एप्रिल रोजी याच परिसरातील 6 महिन्याच्या बाळाला कारोना रोगाची लागण झाल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला होत़ा मात्र आता या तिनही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आह़े शेवटचा रूग्ण 14 तारखेला आढळून आलेला असताना केवळ 12 दिवसांतच साखरतर परिसरातील बंदी उठविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े
तर रत्नागिरी राजीवडा येथील भागात 3 एप्रिल रोजी कारोनाचा रूग्ण आढळून आला होत़ा यानंतर तातडीने हा परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला होत़ा या भागात कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न काही काळ निर्माण झाला होत़ा मात्र प्रशासनाने घेतलेल्या कडक भूमिकेमुळे याठिकाणी अनुचित प्रकार समोर आला नाह़ी याठिकाणच्या रुग्णाचे देखील रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समोर आल्यानंतर 22 एप्रिल नंतर सीलबंदी उठविण्यात आल़ी याठिकाणी एकूण 19 दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला होत़ा
जिह्यातील खेड कारोना रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होत़ी 8 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेनंतर परिसराला सील करण्यात आले होत़े मात्र अद्याप कोणताही रूग्ण आढळलेला नसताना देखील हा परिसरातील बंदी उठविण्यात आलेली नाह़ी याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर येथील बंदी उठविण्यात येईल अशी माहिती सांगण्यात आली आह़े









