प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचा कहर अद्याप ही हद्दपार न झाल्याने जिल्हय़ात विकेंड लॉकडाऊन अद्याप ही कायम ठेवण्यात आला होता. त्यामुळे इतर दिवशी गजबजलेली बाजारपेठ शनिवारी पुन्हा शांत झाल्याचे दिसून येत होती. शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.
त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी ही कमी प्रमाणात दिसत होती. रस्त्यांवर वाहने कमी प्रमाणात असल्याने मोकाट रस्त्याचा ताबा घेतला होता. कित्येक व्यवसायीक तर आपली दुकानांची साफसफाई करून घेणे, दुकानात संपलेला माल भरून घेणे अशी कामे करून घेण्यात येत होती. काही व्यवसायिकांनी आपल्या दुकानांचे अर्धे शटर उघडून व्यवसाय सुरू केला होता.
त्यातच व्यापारी वर्गांकडून विकेंड लॉकडाऊन ही उठविण्याची मागणी करण्यात येत आहे. कारण मागील कित्येक महिने लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याने खूप मोठय़ा आर्थिक आडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच इतर दिवशी व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळेचे बंधन ही घ्यालण्यात आले आहेत. त्यामुळे अद्यापही म्हणावा तितका व्यवसाय होत नसल्याने विकेंड लॉकडाऊन उठविण्याची मागणी करण्यात येत आहे. पण जिल्हाधिकाऱयांनी अद्याप त्याबाबत कोणतेच निर्णय घेतले नाही.









