पशुसंगोपन खात्याची माहिती : जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून राबविली मोहीम
प्रतिनिधी /बेळगाव
पशुसंगोपन खात्यामार्फत मंगळवारी जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये जिल्हय़ातील तब्बल 1824 कुत्र्यांना लस देण्यात आली, अशी माहिती खात्याने दिली आहे.
रेबीज रोगाला आळा घालण्यासाठी जिल्हय़ात रेबीज प्रतिबंधक मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेला श्वानमालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्हय़ातील 1824 तर तालुक्मयातील 830 श्वानांना लस दिली आहे. अलीकडे कुत्र्यांनी माणसांसह जनावरांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत. दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यास रेबीजची लागण होते.
याकरिता खबरदारी म्हणून पशुसंगोपन खात्यामार्फत प्रतिबंधक लस दिली जाते. मात्र जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून तीन महिन्यांवरील पाळीव श्वानांसाठी राबविलेली रेबीज लस मोहीम प्रभावी ठरली आहे. जिल्हय़ातील अथणी, कागवाड, बेळगाव, बैलहोंगल, कित्तूर, चिकोडी, निपाणी, गोकाक, मुडलगी, हुक्केरी, खानापूर, रायबाग, रामदुर्ग, सौंदत्ती आदी तालुक्मयांत ही मोहीम राबविण्यात आली.
सर्वत्र लसीकरण मोहीम यशस्वी
जागतिक रेबीज दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या रेबीज प्रतिबंधक मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात सर्वत्र लसीकरण मोहीम यशस्वी झाली. वर्षातून दोन-तीनवेळा प्रतिबंधक मोहीम राबविली जाते. मात्र या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
-डॉ. अशोक कोळ्ळा (निर्देशक, पशुसंगोपन खाते, बेळगाव)
तालुकानिहाय झालेले रेबीज प्रतिबंधक लसीकरण
| तालुका | रेबीज लस दिलेल्या कुत्र्यांची संख्या |
| अथणी | 106 |
| कागवाड | 10 |
| बेळगाव | 830 |
| बैलहोंगल | 184 |
| कित्तूर | 43 |
| चिकोडी | 40 |
| निपाणी | 53 |
| गोकाक | 50 |
| मुडलगी | 80 |
| हुक्केरी | 42 |
| खानापूर | 190 |
| रायबाग | 27 |
| रामदुर्ग | 107 |
| सौंदत्ती | 62 |
| एकूण | 1824 |









