प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्हय़ात आतापर्यंत एकूण एक लाख 65 हजार 413 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये एकूण नऊ हजार 681 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर सहा हजार 768 जणांनी दुसरा डोस घेतला. 8 हजार 826 प्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर चार हजार 575 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 72 हजार 177 व्यक्तींनी पहिला डोस तर 24 हजार 81 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 62 हजार 277 नागरिकांनी पहिला डोस तर 8 हजार 398 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस घेतला आहे. असे एकूण दोन लाख 9 हजार 235 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्हय़ाला आजपर्यंत एकूण 2 लाख 2 हजार 740 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 56 हजार 380 लसी या कोव्हिशिल्डच्या तर 46 हजार 360 लसी या कोव्हॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 63 हजार 928 कोव्हिशिल्ड आणि 45 हजार 307 कोव्हॅक्सिन असे मिळून 2 लाख 9 हजार 235 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्हय़ातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 4 हजार 390 लसी उपलब्ध असून त्यापैकी 2 हजार 160 कोव्हिशिल्डच्या आणि 2 हजार 230 कोव्हॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्हय़ात सध्या 870 लसी शिल्लक असून त्यापैकी 790 कोव्हिशिल्ड व 80 कोव्हॅक्सिनच्या लसी शिल्लक आहेत.