अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 13 डिसेंबर 2021, दुपारी 12.00
● रविवारी दिवसभरात 2175 जणांचे स्वॅब तपासले
● मृत्युदर रोखण्यात आले यश
● नव्याने बाधित वाढ रोखली
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील बाधित वाढ रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णपणे यशस्वी होऊ लागली आहे. त्यामुळे नव्याने होणारी बाधित वाढ 15 च्या खाली आलेली आहे. रविवारी दिवसभरात 2175 जणांचे स्वॅब तपासणी केले असून 14 नवीन बाधित आढळून आले आहेत. मृत्युदर रोखण्यात यश आले आहे.
लसीकरणात सातारा जिल्हा पुढे
लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय शासकीय कार्यालयात प्रवेश दिला जात नाही. काही कार्यालयात ज्यांचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना पगार दिला जात नाही. प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची काळजी असल्याने लस घेण्यामध्ये ते कुठे मागे राहत नाहीत. त्यामुळे सातारा जिल्हा लसीकरणात पुढे आहे.
सर्व तालुके शून्याच्या दिशेने वाटचाल
सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये एक स्पर्धाच लागलेली आहे की शून्य आपल्या तालुक्यात आला पाहिजे. त्यामध्ये जावली, वाई, पाटण, महाबळेश्वर, कोरेगाव, खटाव या तालुक्यात ही परिस्थिती आहे. सातारा तालुका ही जास्तीतजास्त चार ते पाच पर्यत बाधित आढळून येतात.
सोमवार
नमुने-2175
बाधित-14
सोमवारपर्यंत
नमुने -23,33,930
बाधित-2,52,093
मृत्यू-6,483
मुक्त-2,44,688









