सावंतवाडी/प्रतिनिधी –
लहरी हवामानाचा फटका बळीराजाला दरवर्षीप्रमाणे यंदाही बसला आहे. काही महिन्यापूर्वी झालेल्या धुळीच्या वादळानंतर ऐन आंबा – काजू हंगामावर बुधवारी सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील वर्षी कोरोना मुळे बळीराजाला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले होते. आंबा बाजारपेठेत दाखल होऊन सुद्द्धा अपेक्षित भाव मिळाला नसल्याने नुकसान सोसावे लागले होते. यंदाही आंबा-काजू पीक तयार झाले असताना अवकाळी पावसाच्या रूपाने पुन्हा एकदा संकट उभं राहिलं आहे.









