पुलाची शिरोली / वार्ताहर
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी गेल्या आठ महिन्यांमध्ये कोरोना सारख्या महामारी मध्ये केलेल्या कामाबद्दल येथील वैद्यकीय पथकाचे मित्तल यांनी विशेष कौतुक केले, तसेच शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणारी गावी आणि उपचारासाठी येणारे रुग्ण तसेच दिल्या जाणाऱ्या सेवासुविधा याबाबतही मित्तल यांनी आढावा घेतला व येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्युस यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी ए.एस. पाटील ,औषध विभाग प्रमुख श्री. बामणे श्री .घोलपे आदी उपस्थित होते.









