प्रतिनिधी/ म्हापसा
जिल्हा पंचायत निवडणूक झाल्या तेव्हा भाजपने सर्व जागा भरल्या होत्या. त्यापैकी भाजपा 33 जागा राज्यात जिंकून आल्या आहेत. उत्तर गोव्यात बार्देशात त्यांनी अध्यक्षपद बार्देशचे कार्तिक कुडणेकर जे सुकूरमधून निवडून आले त्यांना उत्तर गोवा अध्यक्षपद देण्यात आले आहे. राज्य सरकारने जिल्हा पंचायतीसाठी 1 कोटीपर्यंत निधी द्यावा अशी मागणी लोबो यांनी केल्याचे मंत्री लोबो म्हणाले. काम खूप आहे. जिल्हा पंचायतमध्ये पालिकडे पाहून काम करणे काळाची गरज आहे. फक्त गटारे बांधली म्हणजे कामे होत नाही. हे पंचायत सदस्यांचे काम आहे. सर्वांनी एकाच दृष्टीकोनातून कामे करू नये. मुख्यमंत्र्यांना मी सूचना देणार आहे. जिल्हा पंचायतीना एक वेगळय़ा पद्धतीने कामे हाताळण्यास द्या. आर्थिक बाबही मोठय़ा प्रमाणात द्यायला हवी. जिल्हा पंचायत सदस्यांना सरकारी निधी 60 ते 70 लाख आहे तो वाढवून 1 कोटीपर्यंत करावा त्याची गरज आहे अशी माहिती मंत्री मायकल लोबो यांनी दिली. बजेट वाढवून त्यांना पॉवर देणे गरजेचे आहे.
मंत्री लोबो म्हणाले की, जे जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले तसेच स्वतंत्र उमेदवार निवडून आले आहेत त्या सर्वांचे अभिनंदन. या सर्व जिल्हा पंचायत सदस्यांनी पुढे जाऊन चांगले कार्य करावे. आपणही एकेकाळी जिल्हा पंचायत सदस्य होतो तेव्हा चौकटीतून बाहेर पडून एक वेगळय़ा पद्धतीने काम केले आहे. प्रत्येक गावात आज चिल्ड्रन पार्कची आवश्यकता आहे. त्याची कमतरता आम्हाला भासत आहे. मुलांना खेळण्यास बॅडमिंटन कोट तयार करावा. असे झाल्यास मुले खूष होतील. खुली जागा आहे ती ताब्यात घ्या ही आपली मागणी आहे. असे मंत्री लोबो म्हणाले.









