प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा कारागृहात पुण्यावरून आणलेल्या कैद्यामुळे कोरोनाची बाधा इतर कैद्यांना झाली. त्या कैद्यांवर आयसोलशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र दि. 15 रोजी सकाळी एक निकट सहवास असलेल्या कैद्यांला ही बाधा झाल्याचे उघड झाले. त्या पार्श्वभूमीवर आता आणखी सुरक्षितता जिल्हा कारागृहात घेतली जात आहे. त्याच्यासोबत इतर 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा कारागृहात कोणत्या ही कैद्यांना आता कोरोनाची बाधा होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचे जिल्हा कारागृहातून सांगण्यात आले.
सातारा शहरात कोरोना बधितांचा आकडा जिल्हा कारागृहातल्या कैद्यांच्यामुळे फुगला आहे. जिल्हा कारागृहात पुणे येथून आणले गेलेले कैदी कोरोना बाधित झाल्याचे उघड होताच शहर पोलीस व कारागृहच हडबडले होते. कारागृह प्रशासनाने लगेच जे जे बाधित कैद्यांच्या निकट आले होते, त्यांना तेथून हलवून लगेच त्यांच्या तपासणी करण्यात आली. तेव्हा कोरोनाचा आकडा वाढत गेला असून त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले. दि. 15रोजी ज्या कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह तेव्हा त्यांनी बाहेर उपचारासाठी हलवण्यात आले. त्यांच्या सहवासात आलेल्या 32 जणांची स्वब तपासणी करण्यात आली होती. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा कारागृहात सर्व उपाययोजना करणे सुरू असून कारागृहात असलेल्या 275 कैद्यांची काळजी घेतली जात आहे, असे जिल्हा कारागृह प्रशासनाने सांगितले.








