देहरादून
उत्तराखंड उच्च न्यायालयाने हरिद्वार धर्मसंसदप्रकरणी जितेंद्र त्यागी उर्फ वसीम रिझवी यांची जामीन याचिका फेटाळली आहे. त्यागी यांच्या भाषणाचा उद्देश दंगली भडकाविणे, शत्रुत्वाला बळ देणे आणि धर्माचा अपमान करण्यासारख्या गोष्टी सामील होत्या असे न्यायालयाने म्हटले आहे. आक्षेपार्ह भाषणाचे दूरगामी परिणाम असतात असे न्यायाधीश रविंद्र मैथानी यांच्या खंडपीठाने नमूद केले आहे. 17-19 डिसेंबर या कालावधीत हरिद्वार येथे आयोजित झालेल्या धर्मसंसदेत कथितरित्या वादग्रस्त भाषण केल्याचा आरोप त्यागी यांच्यावर आहे.









