किमत चार हजार रुपयाच्या आत राहण्याचे संकेत
नवी दिल्ली
रिलायन्स इंडस्ट्रीज आपला स्वस्त स्मार्टफोन दिवाळीअगोदर सादर करण्याच्या तयारीत आहे. येणाऱया काळात कोरोनाची स्थिती निवळून सुधारणा होतील, अशी आशा असून यातून मोबाइलची मागणी वाढण्याचे संकेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स नवा सादर होणारा स्मार्टफोन गुगल यांच्यासोबत मिळून तयार करणार आहे.
रिलायन्स सदरचा स्वस्त स्मार्टफोन संशोधन व विकासातून तयार करत असून कंपनी सुटय़ा भागांची सोय करण्याचा विचार करते आहे. हा स्मार्टफोन 4 जी प्रणालीचा असून याची किमत जवळपास 3649 रुपये राहणार असल्याची माहिती असून याचे बुकिंग पुढील महिन्यात सुरु होणार आहे. रिलायन्सचा स्वस्त स्मार्टफोन येणार असल्याची माहिती सर्वात अगोदर सप्टेंबर 2020 मध्ये समोर आली होती.









