वार्ताहर/ कुडाळ
जावळीतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाया तसेच आपल्या कार्यकर्तृत्वाने तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या पटलावर झळकवून दैदिप्यमान कार्य करणाया व्यक्तींना त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे काम या पुरस्काराच्या माध्यमातून होत आहे. समाजाच्या सर्व घटकांसाठी समर्पण भावनेने केलेल्या कामाची पावती ही समाजाकडून मिळतेच अशा त्या कामांचा, व्यक्तींचा गौरव झाल्याने अधिक प्रेरणा व बळ मिळते असे प्रतिपादन जावळीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.
कुडाळ ता. जावळी येथील गजराज मित्र मंडळाच्या जावली भूषण पुरस्कार 2020 वितरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास माजी उपाध्य़क्ष वसंतराव मानकुमरे, पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गिरी, उपसभापती सारभ शिंदे, माजी सभापती सुहास गिरी, सरपंच विरेंद्र शिंदे, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी सभापती सुहास गिरी यांनी सन्मानित करण्यात आलेल्या सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून गजराज मंडळाच्या उपक्रमाचे कातुक केले, मंडळाचे अध्य़क्ष महेश पवार म्हणाले, आज सर्वच माणसे समाजाचे ऋण फेडतातच असे नाही. पण जी माणसे समाजासाठी जगतात त्यांचीच नोंद इतिहास घेत असतो,
दिलेले पुरस्कार हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत म्हणूनच अशा पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या आदर्श जीवन गैरव म्हणून शंकरराव साळुंखे, आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून संतोष शेलार, आदर्श लोककिर्तनकार म्हणून ह.भ.प. कृष्णा महाराज शास्त्राr, आदर्श पत्रकार म्हणून महेश बारटक्के व सुरेश पार्टे, आदर्श उद्योजक म्हणून हिंदुराव जाधव, शेतकरी म्हणून रमेश बामणे, शिक्षिका म्हणून सा.रंजना सपकाळ, शिक्षक म्हणून जालंदर सुतार, आदर्श संस्था म्हणून राणी लक्ष्मीबाई बचत गट, आदर्श खेळाडू म्हणून सुनिल जवळ आदींना विविध क्षेत्रातील कामगिरी बद्दल मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारदेऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकायांनी परिश्रम घेतले. शशिकांत गुरव यांनी सुत्रसंचालन केले तर महेश पवार यांनी आभार मानले.









