बेळगाव :
दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणारे जायंट्स आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यावर्षी दुदाप्पा बेळगावकर (बेळगुंदी), सी. एन. मुगुटकर (गणेशपूर), अजित शंकरगौडा (पिरनवाडी), मारुती शहापूरकर (ढेकोळी), विजय मगदूम (मुचंडी) यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
वेगवेगळय़ा अभ्यासक्रमात ग्रामीण भागात आपले बहुमोल योगदान देणाऱया या पाच शिक्षकांचा रविवार दि. 6 रोजी शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे अध्यक्ष संजय पाटील आणि सचिव विजय बनसूर यांनी कळविले आहे.









