benifits of black tea: थंडीच्या दिवसात गरमागरम चहा आणि कॉफी घेणं ठरलेलेच असतं.आरोग्यासाठी ब्लॅक टी चं सेवन करणं हे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मानलं जातं.
बरेच डायटप्रेमी देखील ब्लॅक टीलाच पसंती देतात.आज आपण ब्लॅक टी पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत हे जाणून घेऊयात.
ब्लॅक टीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्साइड्स असतात. यामुळे पोटांचे विकार कमी होण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील बॅक्टेरिया नाहीशा होऊन व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनशक्ती वाढण्यास मदत होते.
हृदयरोगासाठी ब्लॅक टी फायदेशीर ठरते. या प्रकारच्या चहाचं सातत्यानं सेवन केल्यानं उच्च रक्तदाब, उच्च कॉलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणाच्या समस्या कमी करण्यास मदत होते.
ब्लॅक टी मध्ये कॅफीन आणि एल-थेनाइन नावाचा एक प्रकारचा अमीनो आम्ल असतं, ज्यामुळं शरीरातील ऊर्जेचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. याशिवाय यामुळं मेंदूची कार्यक्षमता वाढण्यासही फायदा होतो.
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी ब्लॅक टी हा उत्तम पर्याय आहे. दिवसातून ३ ते ४ वेळा ब्लॅक टी चे सेवन केल्याने लठ्ठपणाची समस्या कमी होते, त्याचबरोबर शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
टीप – वरील सर्व माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.