वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूवरील उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेने भारताला 1 अब्ज डॉलरची मदत जाहीर केली आहे. भारताला आरोग्यासाठी देण्यात आलेली ही आजवरची सर्वात मोठी आर्थिक मदत ठरली आहे. ही मदत भारतातील सर्व राज्य व केंद्रशासीत प्रदेशातील कोरोनाबाधित रूग्ण, वैद्यकीय सुविधा, आपत्तकालीन व्यवस्था, रोगनिदान चाचणी व अन्य सेवांसाठी वापरण्यात येईल. कोरोना विषाणूचे संसर्ग रोखण्यासाठी भारताकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, असे जागतिक बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.









