पेठ वडगाव / प्रतिनिधी
कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू सुवर्णकन्या अभिज्ञा अशोक पाटील(मूळ गाव तळसंदे, ता.हातकणंगले) हिने नवी दिल्ली या ठिकाणी सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धा २०२१ मध्ये रौप्य पदक पटकाविले. ही जागतिक नेमबाजी स्पर्धा १८ मार्च २०२१ ते २९ मार्च २०२१ या दरम्यान दिल्ली येथे पार पडत आहे. महिलांच्या वरिष्ठ गटात अभिज्ञाने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र टीम आणि २५ मीटर स्पोर्ट पिस्टल अशा दोन खेळ प्रकारांमध्ये अभिज्ञाची निवड झालेली होती. सध्या अभिज्ञा ही टोकीओ ऑलम्पिक २०२१ कोअर टीम मध्ये आहे.
यामध्ये भारताची टीम क्रमांक दोन मध्ये अभिज्ञा आणि गुरप्रीत सिंग (पंजाब)हे दोन खेळाडू सहभागी होते तर भारताची टीम क्रमांक एक मध्ये तेजस्विनी(हरियाणा) आणि विजयवीर सिद्धू (पंजाब)या दोन खेळाडूंची निवड केलेली होती. या स्पर्धेमध्ये आठ, सहा व चार सेकंद अशा प्रकारचे दोन डाव घेण्यात आले. या दोन्ही डावात अभिज्ञा आणि गुरप्रीत सिंग या दोघांनी तेजस्विनी आणि विजयवीर सिद्धू यांच्यापेक्षा एक गुणाची आघाडी घेतली होती. अंतिम फेरीत अभिज्ञा आणि गुरप्रीत सिंग यांना सिल्वर पदक मिळाले.
नुकत्याच झालेल्या २५ मीटर स्पोर्ट पिस्टल स्पर्धेमध्ये अभिज्ञाने ६०० पैकी ५८६ गुणांची कमाई केली. या स्पर्धेतील सर्व खेळाडूंच्या पेक्षा तिचे गुण सर्वात जास्त होते. मात्र स्पर्धेतील नियमाप्रमाणे तिला अंतिम स्पर्धा खेळता येत नव्हती. या सर्वात जास्त गुणांच्या मुळे अभिज्ञा चा आत्मविश्वास वाढला. या गुणांचा उपयोग तिला आशियाई क्रीडा स्पर्धा, कॉमनवेल्थ स्पर्धा खेळण्यासाठी होऊ शकतो.
अभिज्ञा ही जिल्हा क्रिडा प्रबोधिनी कोल्हापूरची अनिवासी आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू आहे. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर साखरे यांचे मार्गदर्शन मिळाले. तिला गगन नारंग शूटिंग फाउंडेशन पुणे आणि नॅशनल रिफील असोसिएशन ऑफ इंडियाचे जॉईंट सेक्रेटरी पवन सिंग यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तिला कोल्हापूर जिल्हा मेन अँड वुमन रायफल असोसिएशनचे अध्यक्ष युवराज साळुंखे यांचे सहकार्य लाभले.
आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू गगन नारंग, सय्यद तौसिफ, वेद, संदीप तरटे, अजित पाटील, युवराज साळुंखे यांचे अभिज्ञाला मार्गदर्शन लाभले. यशश्री उद्योग समूहाचे विकासराव पाटील आणि विद्यासागर पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच श्रीकृष्ण उद्योग समूह खोचीचे संस्थापक अध्यक्ष बी.के.चव्हाण, माजी उपसरपंच एम. के. चव्हाण, श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ पेठ वडगावचे अध्यक्ष पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सचिव नगराध्यक्षा विद्याताई पोळ तसेच आई प्रतिभा पाटील, वडील अशोक पाटील यांचे पाठबळ मिळाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









