प्रतिनिधी / चूये
हुतात्मा जवान संग्राम शिवाजी पाटील यांच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. डी वाय पाटील समूहाच्यावतीने रुपये तीन लाख रुपयाचा धनादेश आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते वीरपत्नी हेमलता संग्राम पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी हुतात्मा संग्राम पाटील यांच्या घरी भेट देऊन हुतात्मा संग्राम पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी वडील शिवाजी आई साताबाई भाऊ संदीप पत्नी हेमलता यांचे सांत्वन केले.
यावेळी बोलताना ऋतुराज पाटील म्हणाले की हुतात्मा संग्राम पाटील यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावरती मोठा आघात कोसळलेला आहे. त्यांच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. तसेच त्यांचे गावात स्मारक उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हुतात्मा संग्राम पाटील यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉ. पाटील यांच्या समूहाच्यावतीने रुपये तीन लाख रुपयाची मदत यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते वीरपत्नी हेमलता व त्यांच्या कुटुंबीयांच्याकडे सुपूर्त करण्यात आली यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती सागर पाटील ग्रामपंचायत सदस्य अशोक किल्लेदार प्रवीण पाटील शहाजी किल्लेदार बाबासाहेब चौगुले एकनाथ पाटील विश्वास दिंडोर्ले गजानन पाटील टी वाय पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.









