सांगली प्रतिनिधी
राज्य शासनाने जलविद्युत प्रकल्प खासगीकरण करण्याचा जो डाव आखला आहे. हा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही या खासगीकरणाला तितक्याच तीव्रतेने विरोध करावा असे आवाहनही माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत केले. महाविकास आघाडी आणि भाजपामधील भांडण सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडीने १६ नोव्हेंबर २०२१ रोजी ३५ वर्ष पुर्ण झालेल्या जलविद्युत प्रकल्पाचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यामध्ये कोयना स्टेज, कोयना डॅमफूट भाटघर, वैतरणा, येलवरी पैठण याचा समावेश आहे. यातून ४६६ मेगावॅट वीजनिर्मिती होते. राज्यातील शेतकयांना पुर्ण क्षमतेने बीज मिळत नाही आणि आहे त जलविद्युत प्रकल्प खासगीकरणाचा सरकारने जो डाव टाकला आहे तो डाव हाणून पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा डाव हाणून पाडावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून त्यांनी कामकाज करावे असे आवाहनही त्यांनी केले. जर है जलविद्युत प्रकल्प खासगीकरण झाले तर साडे सहा रुपये दराने सर्वांना बीज घ्यावी लागेल असा इशाराडी राजू शेट्टी यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी आणि भाजपाचे भांडण खोटे-खोटे
महाविकास आघाडीचे नेते संजय राजा आणि भाजपाचे नेते किरीट सोमव्या यांच्यात जे भांडण सुरु आहे. दो खाट खोटे आहे. या भांडणातून सामान्य जनतेचा काहीही फायदा होणार नाही. उलट जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत. जना नाकडे दुर्लक्ष करण्यासाठीच हे भांडण सुरु असल्याचा आरोपही राजु शट्टी यानी केला आहे. महाविकास आघाडी आणि भाजप आपणाला तितक्याच दूर अंतरावर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही कोणाबरोबरही नाही राजू शेट्टी ना महाविकास आघाडी बरोबर आहेत ना भाजपा बरोबर आहेत. शेतकर्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना लढत आहे. त्यामुळे राजू शेंडी हे शेतकन्यांच्यासाठी आहेत. महाविकास आघाडीबरोबर नाहीत किंवा नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले