काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाईसत्र सुरू झाले असून, गांधीनगर परिसरात रस्त्याशेजारीच खोदाई करण्यात आली असून, या ठिकाणी असलेले बॅरिकेड्स वाहनधारकांना अडचणीचे बनले आहे. सदर काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
गांधीनगर व न्यू गांधीनगरला जाणाऱया कॉर्नरवर जलवाहिनीसाठी खोदाई करण्यात आली आहे. जलवाहिनीसाठी खोदण्यात आलेला खड्डा नेमका कॉर्नरवर असून सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पण सदर बॅरिकेड्स वाहनधारकांना अडचणीचे ठरत आहेत.
रात्रीच्यावेळी या ठिकाणी वाहनधारकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कॉर्नरवर खोदण्यात आलेल्या खड्डय़ापेक्षा लावण्यात आलेल्या बॅरिकेडचा धोका वाहनधारकांना आहे. त्यामुळे प्रशासनाने हे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी होत आहे.









