वार्ताहर / खंडेराजुरी
शिंदेवाडी (तालुका मिरज) येथे संघर्षपूर्ण झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अँड. सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान शेतकरी विकास पॅनलने नऊपैकी आठ जागा जिंकून तब्बल तीस वर्षानंतर सत्तांतर घडवून आणले. विजयानंतर विजयी उमेदवारांनी गावात प्रचंड मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला.
मिरज पूर्व भागातील शिंदेवाडी हे शेवटचे गाव असून शिंदेवाडीमध्ये गेले तीस वर्ष माजी.प.स.सदस्य शंकर पाटील यांची सत्ता अबाधित होती. पण गेल्या पाच, सहा वर्षांमध्ये नियोजनबद्ध विकास कामे, जनतेच्या अडीअडचणी सोडवून युवा नेते अँड. सचिन पाटील यांनी गावात जोरदार मोर्चेबांधणी केली होती. तसेच युवकांचं नेटवर्क वाढवले होते .त्यांनी प्रचाराचे नियोजन करून संघर्षपूर्ण लढतीत त्यांनी ग्रामपंचायत निवडणूकमध्ये विरोधी शंकर पाटील गटाचा अक्षरशः धुव्वा उडवला.
जय हनुमान शेतकरी विकास पॅनलचे विजय उमेदवार असे संदीप पाटील, उत्तम पाटील, लक्ष्मण साळुंखे, सविता पाटील, वंदना पवार, महादेव लवटे, रूपाली माने, रेखा सुतार. यांनी विजय मिळवला तर विरोधी गटाच्या भारती पाटील या एकमेव विजयी झाल्या.
जय हनुमान शेतकरी पाणी विषयी होण्यासाठी ॲड. सचिन पाटील, माणिक साळुंखे, बी.टी. पाटील, बी. एम. रणदिवे, गोविंद पाटील, काकासाहेब पाटील, अविनाश पाटील, सचिन पवार, अमर पाटील, वसंत साळुंके, अण्णा पाटील, महादेव पाटील यांनी जोरदार प्रचार मोहीम राबवली होती.








