जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर शहरामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता जयसिंगपूर शहरातील रुग्णांवर शहरामध्येच उपचार होणे सोयीचे होण्याच्या दृष्टीने लवकरच १०० बेडचे कोवीड आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात येईल अशी माहिती जयसिंगपूर नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिली.
येथील नगराध्यक्षा नीता माने या सध्या अलगीकरण कक्षात असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घेणे अडचणीचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी निर्देशित केल्याप्रमाणे नगराध्यक्ष पदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्याकडे प्रशासनाकडून मंगळवारी सुपूर्त करण्यात आला. पदभार स्वीकारल्यानंतर संजय पाटील-यड्रावकर बोलत होते.
जयसिंगपूर नगरपालिका, शहरातील डॉक्टर्स, नगरसेवक, नगरसेविका, सेवाभावी संस्था व नागरिकांच्या सहकार्याने शहरातील नागरिकांना अद्यावत आणि तात्काळ रुग्णसेवा मिळावी यासाठी येत्या आठवड्याभरात आयसोलेशन सेंटर सुरु करीत असल्याचे सांगितले, या आयसोलेशन सेंटर मधून जयसिंगपूर शहरांमधील कोरोना संदर्भात लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांसाठी तातडीने उपचार घेणे सोयीचे होणार आहे असेही यड्रावकर यांनी सांगितले.
पदभार स्वीकारल्यानंतर कोवीड आयसोलेशन सेंटर उभारणीच्या या नियोजनासाठी त्यांनी तातडीने आपल्या दालनामध्ये बैठकीचे आयोजन केले होते,कोवीड आयसोलेशन सेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मुख्याधिकारी टीना गवळी, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. खटावकर, डॉ. प्रविण जैन, उपमुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांच्यासह नगरसेवक व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








