इस्लामपूर/प्रतिनिधी
दिल्लीतील शेतकरी आंदोलन व हिंसाचार प्रकरणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील लोकांना भडकवण्याचे काम करीत आहेत. हिंसेचे समर्थन करीत आहेत. ते जबाबदार मंत्री आहेत. आणि त्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे, याचे भान ठेवून वक्तव्य करावीत, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
ते येथे असंघटीत कामगारांच्या मेळाव्यासाठी आले असता, त्यांना पत्रकारांनी सद्यस्थितीवर काही प्रश्न विचारले. दिल्लीतील लाल किल्यावर झेंडा फडकवणारा तो तरुण भाजपा संबंधीत असल्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याबाबत त्यांना पत्रकारांनी छेडले. त्यावेळी काही तरी स्टोरी बनवू नयेत, असे सांगून ते म्हणाले, सगळया जगाने ही घटना पाहिली आहे. शेतकर्यांच्या नावाखाली हिंसेवर विश्वास असणारे लोक दिल्लीत उत्तरले आहेत. या हिंसाचाराची साऱ्या जगाने निंदा केली आहे. त्यामुळे कुणी नवनवीन स्टोरी बनवू नयेत.
पाटील पुढे म्हणाले, सध्या कोरोनाचा प्रसार कमी होत आहे. पण तो संपलेला नाही. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. सध्या सरकार कडून कामगार मजुरांना काहीच दिलेले नाही. साडे सात-नऊ हजाराचे किट मिळेल, या आशेने अशा मेळाव्यांना कामगार गर्दी करीत आहेत. कोरीना कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वत:ला बंदिस्त केले होते. आता कुठे ते बाहेर पडू लागले आहेत. राज्याच्या मंत्र्यांत ताळमेळ नाही. मराठा, ओबीसी आरक्षण, शेतकरी, कामगार, शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. ते जोपर्यंत रस्त्यावर उत्तरणार नाही. तो वर हे सरकार जागे होणार नाही.
Previous Articleकर्नाटकातील पाच जणांना पद्म पुरस्कार
Next Article भुदरगड तालुक्यातील 97 ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर








