ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या भागात अजूनही चकमक सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे जम्मू काश्मीरमधील पुलवामामधील टिकेन भागात ही चकमक झाली. या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी हा भागाला सर्व बाजूंनी वेढा दिला आणि शोध मोहीम सुरू केली.
जवानांची चाहूल लागतच परिसरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला होता. याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार केले. या भागात अजूनही दहशतवादी लपले आहेत का? याचा शोध जम्मू काश्मीर पोलीस आणि बीएसफचे जवान घेत आहेत.









