वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मूमध्ये राहणाऱया घरभाडेकरूंची पूर्ण नोंद करण्यात येणार आहे. एखाद्या घरमालकाने स्वतःच्या भाडेकरूंची माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. जम्मू जिल्हय़ात या प्रकारचे गुन्हे नोंद होण्यास प्रारंभही झाला आहे.
लष्कर-ए-मुस्तफा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हिदायतुल्लाह याला जम्मू जिल्हय़ातून अटक करण्यात आली होती. हा दहशतवादी भठिंडी भागात एका घरात भाडेकरू म्हणून राहत होता. प्रकरणाच्या चौकशीदरम्यान दहशतवाद्याची पत्नीही भाडेकरू म्हणून राहत असल्याचे उघड झाले होते. संबंधित घरमालकांनी त्यांच्याविषयीची माहिती दिली नव्हती.
भाडेकरूंची यादी तयार केल्याने शहरात किती संशयित राहत आहेत हे समजण्यास मदत होणार आहे. जम्मू जिल्हय़ातील भाडेकरूंचे प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.









