वार्ताहर/ जमखंडी
शेतकऱयांचा भारत बंद जमखंडी तालुक्यात अपयशी ठरला असून सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी येथील ए. जी. देसाई सर्कलपासून निषेध मोर्चा काढून मिनी विधानसौधवर मोर्चा आल्यावर तहसीलदार एस. बी. इंगळे यांना निवेदन पत्र दिले. रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची उणीव स्पष्ट दिसून येत होती.
नगरसेवक दानेश घाटगे, माजी नगराध्यक्ष दिलावर शिरोळ आदींनी केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. राज्य युवा मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष आदिनाथ सकाळे, आझम अवटी, राजेसाब कडकोळ, अबुबकर कुडची, तम्मण्णा मांग, पुलकेशी नांद्रेकर, अनिल बडिगेर, बसवराज हरकंगी, गजानन माळे, राघवेंद्र हादीमनी, उदय कडकोळ, रोहित सूर्यवंशी, राजू लोखंडे आदींनी भाग घेतला.









