जुळ्या भावांचा पाण्यात बुडून अंत
प्रतिनिधी / आटपाडी
आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथील 10 वर्षाच्या दोन जुळ्या भावंडाचा नाला बांधातील पाण्यात बुडून अंत झाला. लव आणि अंकुश कोळेकर असे मयत भावांची नावे आहेत. जुळ्या भावंडांच्या या दुर्दैवी घटनेने बाळेवाडी वर शोककळा पसरली.
बाळेवाडी येथील हैबतराव कोळेकर यांची जुळी मुले लव आणि अंकुश आपल्या मेंढ्या घेऊन चारण्यासाठी गेले होते. नालाबांध मध्ये पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यात खेळत खेळत एक जण उतरला. तो त्या पाण्यात अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी दुसरा भाऊ देखील पाण्यात उतरला. दोघेही गाळात रुतलेल्या मूळे त्यांना बाहेर येता आले नाही. परिणामी दोघांचाही बुडून अंत झाला दोन्ही जुळी भावंडे बाळेवाडी जिल्हापरिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीत शिकत होते.
लव आणि अंकुश या दोन्ही जुळ्या भावंडांचा जन्म आणि मृत्यू एकाच वेळी झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तत्पूर्वी आटपाडीत माय लेकाचा पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बाळेवाडी येथील घटनेने पुन्हा घातवर ठरला.