प्रतिनिधी/जत
जत शहरात होमक्वारंनटाईनमध्ये असणाऱ्या एका ३६ वर्षीय तरूणाचा उपचार सुरू असताना मृत्यु झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सदरचा मयत तरुण हा 11 मे रोजी रायगड जिल्ह्यातून आला होता. दोन दिवसांपासून त्याला ताप आल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते,
याबाबत माहिती अशी की, हा मृत तरुण दि. ११ मे रोजी जत शहरात त्याचे घरी आला होता. गेल्या सहा महिन्यांपासून तो आजारी होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते. दरम्यान रायगड येथून आपल्या मूळ गावी आल्यानंतर तो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यास होमक्वारंनटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी पुन्हा त्याची प्रकृती बिघडलेली होती. त्यानंतर शहरातील एका खासगी हॉस्पीटल मध्ये त्याला उपचारासाठी दाखल केले असता तेथिल डॉक्टरनी त्याला काविळ झाल्याचे निदान केले. तसेच त्याच्या शरीरातील रक्त ही कमी झाले होते. शिवाय त्याच्या पूर्वीच्या आजाराची हिस्ट्री देखील तशीच व सद्यस्थितीत लक्षणे ही तीच होती, त्यानुसार उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला,
याबाबत तहसिलदार सचिन पाटील यांनी सांगितले की, सदर तरुणाच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले होते, त्याला कोरोनोची तशी कोणतीही लक्षणे नव्हती, याबाबत जिल्हा आधिकारी, जिल्हा आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा झाली असल्याचे सांगितले. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे स्वाब घेता येत नाहीत, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासन दक्षपणे काम करत असल्याचेही ते म्हणाले.
Previous Articleकोल्हापूर : आकनूर येथे दिल्लीवरुन आलेल्या युवकाला कोरोनाची लागण
Next Article कोल्हापुरात आणखी 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण








