1 लाख 60 हजार जणांचा झाला होता मृत्यू
जगातील सर्वात भयावह बेट 54 वर्षांपासून पूर्णपणे बंद आहे. 1930 पर्यंत तेथे एक हॉस्पिटल चालविले जायचे, परंतु हॉस्पिटलच्या संचालकाने एका उंच टॉवरवरून उडी घेत आत्महत्या केली होती, त्यानंतर बेटाबद्दल अनेक प्रकारच्या गोष्टी समारे येऊ लागल्याने ते पूर्णपणे बंद करण्यात आले होते.
या बेटाचे नाव पोवेग्लिया असून ते इटलीच्या व्हेनिस आणि लिडो शहरांदरम्यान आहे. 14 व्या शतकात येथे प्लेगमुळे सुमारे 1 लाख 60 हजार लोकांचा मृत्यू झाला होता असे मानले जाते. ब्लॅक डेथच्या संशयित लोकांना व्हेनिसमध्ये शिरण्यापूर्वी तेथे क्वारंटाइन केले जात असल्याने तेथे मोठय़ा प्रमाणावर लोकांचे मृत्यू झाले होते.
1922 मध्ये बेटावरील इमारतींमध्ये मनोरुग्णांना ठेवण्यात आले होते. डॉक्टर तेथील रुग्णांवर प्रयोग करायचे असे मानले जायचे. याचदरम्यान तेथे एका डॉक्टरचाच मृत्यू झाला होता. आता देखील तेथील पडझड झालेल्या इमारतींच्या परिसरात डॉक्टरांची उपकरणे विखुरलेली दिसून येतात. तेथे नर्सिंग होम देखील चालविण्यात आले होते. परंतु 1968 पासून हे बेट पूर्णपणे बंद करण्यात आले होते.

मागील 54 वर्षांपासून पोवेग्लिया बेट आणि तेथील रुग्णालय पूर्णपणे बंद आहे. 2015 साली हे बेट पुन्हा विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोवेग्लिया बेटावर लक्झरी रिसॉर्ट तयार करण्याचा प्रस्ताव आहे. उद्योजक लुइगी ब्रुगनारो या बेटाला विकसित करण्यास उत्सुक होते. तरीही हा प्रस्ताव अपूर्ण राहिला आहे. पोवेग्लिया बेट आताही भीतीदायकच असल्याचे मानले जाते.
अर्बन एक्सप्लोरर्सचे मॅट नादिन आणि अँडी थॉम्पसन यांनी पोवेग्लिया बेटावर एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ त्यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये युटय़ूबवर पोस्ट केला होता. व्हिडिओत त्यांनी बेटावरील स्थिती दर्शवत हे अत्यंत भयानक असल्याचे म्हटले होते.









