नवी दिल्ली :
मोबाईल निर्माता कंपनी झिनी मोबाईल्सने जगातील सर्वात छोटा फोन ‘झांको टिनी टी 2’ बाजारात आणला आहे. या फोनचा आकार हाताच्या अंगठय़ा सारखा आहे. यात यूजर्सना पॅमेऱयासह सुमारे 14 सुविधा मिळणार आहेत. हा फोन फक्त 79 डॉलर म्हणजे 5 हजार 600 रुपयांमध्ये ग्राहक विकत घेऊ शकतात. कंपनी लवकरच हा फोन भारत, नेपाळ, यूके आणि जपानच्या बाजारपेठेत आणणार आहे. हा फोन फक्त यूएस बाजारापेठेत सादर करण्यात आला असून, वेबसाईटच्या माध्यमातून या फोनची नोंदणी करता येणार आहे. ग्राहकांना या फोनमध्ये 2.4 इंच डिस्प्ले, 32 जीबी क्षमतेचा वाढविण्या इतका मायक्रो एसडीकार्ड स्लॉट उपलब्ध असून, यूजर्सना काही ट्रेडिंग गेम्सची सुविधा मिळणार आहे. कंपनीने यात रियर पॅमेरा असून, 0.3 मेगापिक्सल सेन्सर आणि फ्लॅश लॅन्स आहे. ब्लूटूथ, 5 हजार एमएएच बॅटरी आणि 3 जी कनेक्टिव्हीटीसह टॉक अँड टेक्स्ट फिचरही फोनमध्ये देण्यात आले आहे. या फोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे 6 तासापर्यंत चालू शकते. तसेच बॅटरीचा स्टॅन्डबाय टाईम सात दिवसापर्यंत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.